www.mespune.org

मराठी विभागाविषयी माहिती

आमच्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटी पुणे ०१ , नौरोसजी वाडिया महाविद्यालयामध्ये मराठी हा विषय महाविद्यालय स्थापन झाल्यापासून शिकवला जात आहे.सुरुवातीला प्रसिद्ध कवी व.भा पाठक हे मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते ,त्यानंतर डॉ.म. वी .गोखले , प्रा .डॉ. जयवंत अहिवळे हे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. तसेच सध्या विभागामध्ये प्राध्यापक म्हणून डॉ.उमा उत्तम काळे,डॉ. समिंदर घोक्षे, प्रा.संजय भांगरे,प्रा. स्मिता गाढावे हे सर्व सहाय्यक अधिव्याख्याता पदावर कार्यरत आहेत.महाविद्यालयामध्ये अनेक मान्यवर चर्चासत्र व सेमिनार च्या माध्यमातून आले आहेत . त्यामध्ये व.पु. काळे ,शांता शेळके,रावसाहेब कसबे , उत्तम कांबळे ,उत्तम बंडू तुपे ,रामनाथ चव्हाण,डॉरविंद्र ठाकूर , डॉ. द. भि. कुलकर्णी,डॉ.श्रीपाल सबनीस,डॉ.मनोहर जाधव,डॉ.अविनाश सांगोलेकर , डॉ.प्रभाकर देसाई ,डॉ.तुकाराम रोंगटे,डॉ.राजाभाऊ भैलुमे,कवि गणेश काळघुगे, डॉ,गुंफा कोकाटे,हरी नरके,लक्ष्मीकांत देशमुख,कवयित्री सुवर्णा पवार,डॉ. संजय नगरकर, आदी मान्यवर आले आहेत. दिवसेंदिवस मराठी विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. आमच्याकडे एफ. वाय.बी. ए. या वर्गाच्या पाच तुकड्या आहेत. प्रथम वर्ष कला शाखेत मराठी हा विषय घेणारे २५० ते ३०० विद्यार्थी दरवर्षी असतात.

महाविद्यालायाच्या ग्रंथालयात १९०३ पासूनची पुस्तके आहेत. त्यामध्ये मराठी बरोबर उर्दू, पर्शियन, अरेबिक, संस्कृत भाषेचे शब्दकोश आहेत. संस्कृतीकोश आहेत. पुण्यातच नाही तर महाराष्ट्रात संशोधनाच्या क्षेत्रात वाडिया महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे ग्रंथालय परिपूर्ण म्हणून ओळखले जाते.शिवाय विभागाचे स्वतंत्र ग्रंथालय आहे.

महाविद्यालयाच्या मराठी विभागात अत्यंत उत्स्फूर्त व संशोधन क्षेत्रात प्राविण्य मिळविलेला प्राध्यापक वर्ग आहे. मराठी वाङ्मय मंडळ सतत कार्यक्षम असते. विविध स्पर्धांचे वर्षभर आयोजन केले जाते. शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. मराठी या विषयाचा व्यासंग वाढावा म्हणून विभागाच्या ग्रंथालयामध्ये अनेक वाचनीय ग्रंथांचा समावेश केला आहे. विद्यार्थी उत्स्फूर्तपणे या ग्रंथांचे वाचन करतात व पुस्तक चर्चा घडवून आणल्या जातात.

सध्या महाविद्यालयात मराठी हा विषय प्रमुख विषय (स्पेशल मराठी) म्हणून शिकवला जातो. स्पेशल मराठी विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बी.ए. (मराठी) नंतर महाविद्यालयातच एम.ए. करता यावे म्हणून आम्हाला आमच्या महाविद्यालयात एम. ए. मराठीचे वर्ग पुढील वर्षापासून सुरु करावयाचे आहेत. दरवर्षी बी. ए. फस्ट क्लास, डिस्टिंगशन ,ने पास होतात. ते विद्यार्थी एम.ए. मराठी आमच्याच महाविद्यालयात ते करू इच्छितात.परंतु जड अंत: करणाने त्यांना दुस-या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो.त्यांची आमच्याच महाविद्यालयात सोय व्हावी हि अपेक्षा आहे. मराठी या आमच्या उपक्रमाला आमच्या महाविद्यालयाचे, आणि मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे पूर्ण सहकार्य मिळत आहे.

मराठी विभागाच्या वतीने राबविण्यात येणारे अभ्यासक्रम

मराठी विभागाच्या वतीने कनिष्ठ विभागामध्ये आकरावी व बारावी हे वर्गचालविले जातात. या विभागाची संपूर्ण जबाबदारी प्रा. संजय भांगरे व स्मिता गाढवे हे सांभाळतात.प्रथम वर्ष कला द्वितीय वर्ष कला, तृतीय वर्ष कला, द्वितीय वर्ष विज्ञान, हे पदवी वर्गाचे अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत.या अभ्यासक्रम सोबतच एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स चे Modern Indian Languages, व कार्यक्रम संयोजन कौशल्य,हे देखील राबविण्यात येतात.

विभागप्रमुख

विभागप्रमुख

प्रा. डॉ. फरहात सुर्वे

प्र. प्राचार्य व मराठी विभागप्रमुख

पी. एच. डी., एम. एस. सी., पी. जी. डी. ओ. एम.

वरिष्ठ विभाग

अनु. क्र.प्राध्यापकाचे नावपदनाम

कनिष्ठ विभाग

अनु. क्र.अध्यापकाचे नावपदनाम
श्री. संजय भांगरेसहाय्यक अध्यापक

मराठी विभागाविषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन

१) शासकीय परिपत्रकानुसार दुसऱ्या सत्रात ३ ते १८ जानेवारी २०२० दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात आला. कथालेखन, स्वरचित काव्यलेखन, निबंधलेखन, प्रश्नमंजुषा, म्हणिलेखण, गितगायन, नृत्य, यामध्ये विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवित असतात.

२) विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला उत्तेजन देण्यासाठी ५जानेवारी२०२०रोजी ‘म्हणीलेखन’ व ‘सुंदर हस्ताक्षरलेखन’ स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. १० जानेवारी २०२० रोजी मराठी भाषा संवर्धनाच्या अनुषंगाने मराठी इतिहास, साहित्य व संस्कृतीवर आधारित ‘प्रश्नमंजुषेचे’ आयोजन केले जाते. ‘काव्यवाचन’ स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांबरोबर हौशी प्राध्यापक वर्गानेही सहभाग नोंदवून स्वरचित, प्रसिद्ध कवींच्या कविता सादर करून दाद मिळवितात.

३) विभागाच्या विविध स्पर्धांचे परीक्षण करण्याची भूमिका प्रा.सुरेश धर्माधिकारी, डॉ.मीन ढोले,प्रा. ऋजुता चतुर ,प्रा. मयूर गोहाड,प्रा.अनीता पाटील, प्रा. अनिकेत नरके, डॉ.मंजुश्री मुसमाडे,प्रा. किशोर मुठेकर,प्रा.नागनाथ भुसनाळ, डॉ. उमा उत्तम काळे , प्रा.संजय भांगरे प्रा.स्मिता गाढवे, डॉ. समिंदर घोक्षे या शिक्षकांनी पार पडतात.

४) मराठी विभागाच्या वतीने ‘माय मराठी’सदरांतर्गत विद्यार्थ्यांकडून मराठी भाषा इतिहास, अस्मितेचा जागर माहिती संकलन व भित्तीपत्रकांतून ग्रंथालयातील आविष्कारमध्ये दर्शविला गेला.

५) मराठी विभागाच्या स्वतंत्र ग्रंथालयातून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी क्रमिक पुस्तकांबरोबरच आवंतर वाचनासाठी ग्रंथ, संदर्भग्रंथ व मासिके उपलब्ध करून दिली जातात.

६) विविध वक्तृत्व, निबंध तसेच , शासकीय स्पर्धांपरीक्षा जसे. तलाठी, स्टाफ सिलेक्शन, एमपीएससी, युपीएससी, नेट, सेट इ. साठी विभागातील प्राध्यापकांकडून मोफत व वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते.

७) अस्मिता या भीतीपत्रकाचे लेखन विद्यार्थी स्वत संपादक मंडळातून करीत असतात.वर्षभर मराठी विभागाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धेतील गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन दि. २७ जानेवारी २०२० रोजी ‘वार्षिक पारितोषिक वितरण’ समारंभात गौरविण्यात येते.

८) गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करताना त्यांनी प्रत्येकाला मराठी विभाग हा मराठी भाषेच्या आकलन, आग्रह व संवर्धनाचे आवाहन करताना दिसतो .

९) मराठी विभागामध्ये विद्यार्थी मौरीशस येथून विद्यातही शिशीवरूती मिळउण सहभागी होत असतात.

मराठी विभागाविषयी छायाचित्र